पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: पूरग्रस्तभागांची पाहणी करताना खासदारांची नाव उलटली

भाजप खासदारांची नाव उलटली

बिहारमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पूराने थैमान घातले आहे. या पूरामुळे बिहारमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पाटणामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाजपच्या खासदाराची नाव अचानक उलटली. सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. या घटनेमध्ये ते किरकोळ जखमी झाले.

आदित्य ठाकरे 'कोट्यधीश', जाणून घ्या संपत्ती

माजी केंद्रीय राज्य मंत्री आणि पाटलीपुत्र मतदारसंघाचे भाजप खासदार राम कृपाल यादव बुधवारी पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी धनरुआ येथील रमणी बिगहा भारात पूराची पाहणी करण्यासाठी ते नावमधून जात होते. याचवेळी नाव उलटली आणि खासदार राम कृपाल यादव नदीत पडले. त्याच्यांसोबत नावमध्ये ६ जण उपस्थित होते. नाव उलटताच त्यांच्यासोबत असलेल्यांनी आणि नदीकाठी उभ्या असलेल्यांनी त्यांना वाचवले. या घटनेमध्ये खासदार किरकोळ जखमी झाले आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे. स्वत: राम कृपाल यादव यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 

नितेश राणेंनी भाजपमध्ये केला प्रवेश

बिहारमध्ये पूरामुळे आतापर्यंत ७३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बिहारमधील अनेक शहरांपासून गावांपर्यंत पूराचा फटका बसल आहे. पूराचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे अनेकांचा संसार उध्वस्थ झाले आहेत. एनडीआरएफची टीम आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तसंच वायूदलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्यांने पूरग्रस्तांना जेवणाची पाकिटं पूरवली जात आहेत. 

माथेफिरू तरूणाकडून प्रेयसीची हत्या, नंतर स्वतः केली आत्महत्या