पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काँग्रेस भाजप नेत्यांविरोधात मारक शक्तीचा प्रयोग करत आहे'

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

मध्य प्रदेशच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या वादग्रस्त वक्तव्यामुळे आधीच चर्चेमध्ये आहेत. अशामध्ये आज पुन्हा त्यांनी  वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर भोपाळमध्ये श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप लावले आहेत. भाजप नेत्यांच्या एकापाठोपाठ एक होणाऱ्या निधनावर त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'काँग्रेस भाजप नेत्यांविरोधात मारक शक्तीचा प्रयोग करत आहे.' असे साध्वी यांनी म्हटले आहे.

चिदंबरम यांना झटका,हायकोर्टच्या आदेशाला स्थगितीस SCचा नका

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कार्यक्रमा दरम्यान असे सांगितले की, 'एकदा एका महाराजांनी मला सांगितले होते की आमची खूप वाईट वेळ सुरु आहे आणि विरोधी पक्ष काहीतरी करत आहे. ते भाजपच्याविरोधात मारक शक्तींचा प्रयोग करत आहेत. महाराजांनी सांगितलेले मी काही दिवसांनी विसरले होते. मात्र, आता मी आमच्या वरिष्ठ नेत्यांना एकामागे एक जाताना पाहत आहे. तेव्हा मला महाराजांनी सांगितल्या गोष्टीवर विचार करणे भाग पडत आहे की यामागे नेमकं काय कारण असू शकते?'

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'नारळ'

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी मात्र साध्वी यांच्या वक्तव्यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर काँग्रेसच्या खासदारांनी साध्वींच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. साध्वी याआधी देखील त्यांच्या वादग्रस्त वक्त्यव्यामुळे चर्चेमध्ये आहेत. याआधी त्यांनी मध्यप्रदेशच्या एका कार्यक्रमात असे म्हटले होते की, आम्ही नालेसफाईसाठी खासदार बनलो नाहीत. ज्या कामासाठी आम्हाला खासदार बनवले आहे ते काम आम्ही प्रामाणिकपणे करु. तर लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी नथुराम गोडसे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, नथुराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्त राहणार. 

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, बार्शीचे आमदार सोपल शिवसेनेत