पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात करणार कायदेशीर कारवाई'

प्रज्ञा सिंह ठाकूर

भारतीय जनता पक्षाच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. प्रज्ञा सिंह ठाकूर भोपाळ येथील माखन लाल विद्यापीठात आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थिनींना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी 'प्रज्ञा ठाकूर परत जा' अशा घोषणा केल्या. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. घोषणाबाजी करण्याऱ्या विद्यार्थ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले. 

भाजपच्या मित्रपक्षांना नागरिकत्व कायदा - एनआरसीवरून काय वाटते?

माखन लाल विद्यापीठात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी आंदोलन करत आहेत. हजेरी कमी असल्यानं या विद्यार्थिनींविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईविरोधात दोन्ही विद्यार्थिनी मंगळवार रात्रीपासून विद्यापीठाच्या गेटसमोर आंदोलनासाठी बसल्या आहेत. या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी प्रज्ञा सिंह ठाकूर तिथे गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्याविरोधात एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

रेल्वे मंत्री म्हणतात, १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलंय

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले की, 'धरणे आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी फोन केल्यावर मी विद्यापीठात गेले. मी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेत त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत विद्यार्थिनींना न्याय मिळवून द्यावा असे सांगितले. राज्यपालांच्या भेटीनंतर मी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जाऊन विद्यार्थिनींना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. त्याचवेळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी अशोभनीय घोषणा दिल्या.' दरम्यान, 'मी कायदेशीर तज्ज्ञाचा सल्ला घेत आहे जेणेकरुन जनतेने निवडलेल्या प्रतिनिधीविरूद्ध असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकेल.', असे त्यांनी सांगितले. 

दिल्लीतून उगम पावलेलं ग्रहण कधी सुटणार?, धनंजय मुंडेंचा खोचक