पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'या' व्हिडिओमुळे हेमा मालिनी सोशल मीडियावर ट्रोल

खासदार हेमा मालिनी

देशातील जनतेला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आज भाजपच्या खासदारांनी संसद भवन परिसरामध्ये झाडू मारला. झाडू मारणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांचा समावेश होते. त्याचसोबत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी स्वच्छ भारतचा संदेश देत या अभियानामध्ये सहभाग घेतला. याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. त्यामध्ये हेमा मालिनी या झाडू मारताना दिसत आहे. हाच व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओवरुन हेमा मालिनी यांच्यावर तरह- तरहचे मीम्स शेअर केले जात आहे.

या व्हिडिओवरुन भाजप खासदार हेमा मालिनी यांना झाडू मारताना पाहून अनेकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहे. काही लोकांनी याला भ्रम असल्याचे म्हटले आहे. अनेकांना व्हिडिओ पाहून त्या झाडू मारतात की नाही हेच कळत नसल्याचे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, त्या ज्या ठिकाणी झाडू मारत आहेत त्या जागी त्याच्या हातातला झाडू जमिनीवर पोहचतच नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ लोकांसाठी हसण्याचा विषय बनला आहे. काहींनी तर या व्हिडिओला अशी देखील कमेंट केली आहे की, 'हेमी मालिनी यांना टांगा चालवायलाच द्या.

भविष्यातील संघर्ष अधिक घातक आणि कल्पनेपलिकडचेः लष्करप्रमुख

हेमा मालिनी यांनी यावेळी सांगितले की, ही खूप मोठी गोष्ट आहे की लोकसभा अध्यक्षांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संसद भवन परिसरामध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. पुढे त्यांनी असे सांगितले की, पुढच्या आठवड्यामध्ये मथुराला जाणार असून त्याठिकाणी देखील या अभियानाची सुरुवात करणार आहे.

काँग्रेसच्या ५ बंडखोर आमदारांची राजीनाम्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव