पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीर

भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांना एका पत्राच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली. माझ्यासह कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख गौतम गंभीर यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रामध्ये केलाय.

कलम 370: 'जे कुणाला जमलं नाही, ते आम्ही करून दाखवलं'

गौतम गंभीर यांनी पत्राच्या माध्यमातून पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन कॉल आला होता. या कॉलच्या माध्यमातून मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भाची तक्रार नोंदवून माझ्यासह कुटुंबियांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली. गौतम गंभीर यांनी २० डिसेंबरला शाहदरा पोलिस आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. 7 (400) 043 या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरुन माझ्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी  देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी पत्रामध्ये केलाय.   

'मुला अजून POK बाकी आहे', गौतम गंभीरचे आफ्रिदीला 'परफेक्ट' उत्तर

माजी क्रिकेटर माजी खासदार गौतम गंभीर हे अनेक मुद्द्यावर रोखठोक मते मांडत असतात. नुकत्याच जामिया विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबद्दलही त्यांनी आपली भूमिका मांडली होती. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे चुकीचे आहे. मात्र स्वरक्षणासाठी पोलिसांनी ही कारवाई केल्यास त्याला अयोग्य म्हणता येणार नाही, असे म्हटले होते. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० च्या मुद्यावरुनही गंभीर यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीवर तोफ डागल्याचे पाहायला मिळाले होते. भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवत त्यांना मिळालेला विशेष राज्याचा दर्जाही संपुष्टात आणला. त्यावर आफ्रिदीने टि्वट करत संयुक्त राष्ट्रावर प्रश्न उपस्थित केला आणि अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा केली होती. आफ्रिदीच्या या टि्वटला क्रिकेट जगतातून गंभीरने चोख उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले होते.