पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहिन बागमधील मुस्लिमांना विरोधकांचे संरक्षणः भाजप खासदार

शाहिन बाग आंदोलन

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) शाहिन बागसह देशातील काही भागांमध्ये आंदोलन सुरु आहे. नुकताच शाहिन बागमध्ये या आंदोलनाविरोधात दोन युवकांकडून गोळीबाराची घटना घडली. दोन्ही युवकांना पोलिसांनी घटनास्थळावरुन अटक केली होती. गोळीबाराच्या या घटनेवर भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी मुसलमानांना संरक्षण देऊन शाहिन बागेत बसवले आहे. जामियामध्ये घडलेल्या घटनेचा सीएएशी काही संबंध नाही. आमच्या अल्पवयीन मुलांनी भ्रमित होऊन गोळीबार केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

केरळमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण

दिल्लीतील जामिया परिसरात गुरुवारी एका युवकाने गोळीबार केला होता. तर शनिवारी शाहिन बाग परिसरात हवेत गोळीबार करण्यात आला होता. सीएएविरोधात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने पोलिसांसमक्ष गोळीबार केला होता. यात जामियाचा एक विद्यार्थी जखमीही झाला होता. 

हल्लेखोर ग्रेटर नोएडातील जेवर येथील रहिवासी आहे. तो सुमारे एक ते दीड मिनिट गावठी कट्टा घेऊन रस्त्यावर फिरत होता. पोलिसांनी त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

महात्मा गांधीजींचा सत्याग्रह हे नाटक होतं: भाजप नेता

दरम्यान, दिल्लीतील शाहिन बाग येथील आंदोलनाला रविवारी ५० दिवस पूर्ण झाले. शाहिनबागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आंदोलनामुळे मागील ५० दिवसांपासून दुकानदारांना आपले दुकानाचे शटरही उघडता आलेले नाही.