पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साक्षी-अजितेशला जीवे मारण्यासाठी दिली ५० लाखांची सुपारी

साक्षी आणि तिचा पती अजितेश

वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणारी आमदार राजेशकुमार मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. साक्षी आणि तिचा पती अजितेश यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दोघांना जीवे मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी सीएम पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. साक्षीने तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, 'तिचे पती अजितेशला धमकावले जात आहे आणि त्याची बदनामी केली जात आहे.' 

'तुरुंगात गेलेल्यांनी शरद पवारांनी काय केलं हे सांगू नये'

साक्षी आणि तिचा पती अजितेश यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मोबाईलवर सतत धमकीचे मॅसेज येत आहेत. 'लोकं त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहे. दोघांनी चांगले वागले नाही त्यामुळे तुमचा नाश करेल', अशा प्रकारच्या धमक्या येत आहेत. साक्षीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'जिद्दी जाट' नावाच्या आयडीवरुन एका तरुणाने तिला आक्षेपार्ह मॅसेज पाठवत धमकी दिली आहे. 

खूशखबर! पीएफवरील व्याजदरात वाढ

या तरुणाने दावा केला आहे की, 'त्याला ५० लाखांची सुपारी मिळाली आहे. तीन महिन्यात अजितेशचे काम पूर्ण करुन टाकेल' असा मॅसेज त्याने पाठवला आहे. तर, अजितेशला ट्विटर आणि मोबाईलवर अभिषेक शर्मा नावाचा तरुण सतत शिविगाळ करत आहे. याप्रकरणी त्यांनी बरेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिषेक शर्मा मथुराचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याच्याविरोधात अद्याप कारवाई करण्यात आली नाही. या घटनेमुळे बरेली पोलिस सतर्क झाले आहेत. 

मोहालीत ढगाळ वातावरण असेल, पण शक्यता धावांचा पाऊस