पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपच्या 'बॅट्समन' आमदाराला जामीन

आमदार आकाश विजयर्गीय

इंदूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याप्रकरणी आणि वीज कपातीविरोधात केलेल्या आंदोलनाप्रकरणी आमदार आकाश विजयवर्गीय यांना भोपाळच्या विशेष न्यायालयाने जामीन दिला आहे. यापूर्वी सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने गुरुवारी विजयवर्गीय यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना ११ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या दोन्ही प्रकरणात आकाश यांना क्रमशः ५०००० आणि २०००० रुपयाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. 

भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आणि पहिल्यांदाच आमदार झालेले आकाश विजयवर्गीय यांनी गत बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्याला खुलेआमपणे बॅटने मारहाण केली होती. महापालिकेच्या पथकाककडून अतिक्रमणविरोधात मोहीम सुरु होती. याचदरम्यान इंदूरचे आमदार आकाश तिथे पोहोचले. अधिकाऱ्यांशी बोलताना आकाश यांचे नियंत्रण सुटले आणि त्यांनी बॅटने त्या अधिकाऱ्याला मारण्यास सुरुवात केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आकाश यांच्याशिवाय १० इतर लोकांविरोधात भारतीय दंडविधान कायदा ३५३, २९४, ५०६, १४७, १४८ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाची पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण