पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जय श्री राम' या घोषणेतून भाजप धर्म अन् राजकारण एकत्र करत आहे : ममता

ममता बॅनर्जी

'जय श्री राम' घोषणाबाजीतून भाजप धर्म आणि राजकारण एकत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून भाजपवर आरोप केला. त्यांनी लिहलंय की, 'जय सिया राम, जय रामजी की, राम नाम सत्य है!' ही घोषवाक्य धर्माशी संबंधित आहेत. परंतु भाजप 'जय श्री राम' ही घोषणा पार्टीच्या घोषवाक्यासारखे चुकीच्या पद्धतीने वापरुन धर्म आणि राजकारण यांचे मिश्रण करत आहे.    

काही खास घोषणा एखाद्या रॅली किंवा पार्टीच्या कार्यक्रमात वापरल्या तर त्यावर आक्षेप नाही. परंतु आपण एखाद्यावर धार्मिक घोषणाबाजीचे समर्थन करत नाही. तिरस्काराच्या विचारसरणीतून होत असलेल्या कृत्याचा विरोध करायला हवा.  

'जय श्रीराम'ची घोषणा ऐकताच ममतादिदी भडकल्या

ममता बॅनर्जी गुरुवारी आपल्या ताफ्यासह असताना काही व्यक्तींच्या समूहाने त्यांच्या गाडीसमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. या घटनेमुळे त्या चांगल्याच संतापल्या होत्या. गुरुवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.