पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोण प्रशांत किशोर?, केंद्रीय मंत्र्यांच्या या प्रश्नाला असे मिळाले उत्तर

प्रशांत किशोर

कोण प्रशांत किशोर? असा उलट प्रश्न केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला. आपल्याला प्रशांत किशोर माहितीच नाही किंबहुना ते तितके मोठे नाहीत, असे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यांच्या या प्रश्नार्थक उत्तराला थेट प्रशांत किशोर यांनी प्रत्युत्तर दिले.

SBIची दणदणीत ऑफर, गृहकर्ज हवे असेल तर लगेच अर्ज करा

सध्या राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे वार वाहात आहेत. त्यातच भाजपचा येथील विरोधक आम आदमी पक्षाची निवडणूक प्रचार रणनिती ठरविण्याचे काम प्रशांत किशोर यांच्या कंपनीकडेच देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर हरदीप पुरी यांनी हे उत्तर दिले. 

हरदीप पुरी यांच्या प्रश्नार्थक उत्तराला प्रत्युत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले, ते तर वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांना माझ्यासारखा सामान्य माणूस का माहिती असेल? माझ्यासारखी उत्तर प्रदेश-बिहारमधून आलेली लाखो माणसे दिल्लीमध्ये स्थायिक झाली आहेत. हरदीप पुरी यांच्यासारखा वरिष्ठ नेत्याला एवढी सगळी माणसे कशी काय लक्षात असतील, असे प्रशांत किशोर यांनी म्हटल्याचे एएनआयने म्हटले आहे. 

मेरठ पोलिस अधीक्षकांच्या वक्तव्यावरुन प्रियांका गांधीचा भाजपवर निशाणा

हरदीप पुरी हे केंद्रामध्ये गृहनिर्माण मंत्री आहेत. ते म्हणाले मी प्रशांत किशोर यांना व्यक्तिगतपणे ओळखत नाही. काही पत्रकारांनी त्यांना २०१४ ची आठवण करून दिली. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार मोहिमेमध्ये प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका होती. हे सांगितल्यावर त्यावेळी मी त्या मोहिमेत नव्हतो. त्यामुळे मला त्याबद्दल काही माहिती नाही, असे हरदीप पुरी म्हणाले.