पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंदुत्त्व म्हणजे भाजप नाही, अयोध्येत मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (छायाचित्रः टि्वटर)

मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अयोध्येत गेलेले उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. मी भाजपपासून वेगळा झालोय. हिंदुत्त्वापासून नाही. हिंदुत्त्व म्हणजे भाजप नाही, असा टोला त्यांनी लगावला.

फुल न फुलाची पाकळी! सेनेकडून राम मंदिरासाठी १ कोटी

रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.  ते पुढे म्हणाले, मी तिसऱ्यांदा अयोध्येत आलो होते. अयोध्येते येणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी वारंवार अयोध्येत येईन. नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्येच मी मुख्यमंत्री झालो. मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या आधी आलो होतो. त्यावेळी चांगले यश मिळाले होते. मी अयोध्येला नियमित येत राहणार आहे. मी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेणार आहे. 

मला शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती. परंतु, कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे तेथे आरती करता येणार नाही. पण मी पुढच्यावेळी जेव्हा येईन तेव्हा आरती करणारच असल्याचे ते म्हणाले. 

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर ED च्या कार्यालयात, चौकशी सुरु

यावेळी त्यांनी अयोध्येत महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा केली. यासाठी लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच शिवसेनेच्या ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी १ कोटी देणगी देणार असल्याची घोषणाही केली.

VIDEO : ... आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. मी भाजपपासून वेगळा झालो असलो तरी हिंदुत्त्वापासून नाही. हिंदुत्त्व म्हणजे भाजप नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर बोलण्याचे टाळले.