पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परराष्ट्र मंत्री जयशंकर गुजरातमधून राज्यसभेवर जाण्याची शक्यता

एस जयशंकर

भाजप परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना गुजरातमधून तर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना बिहारमधून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. सू्त्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि स्मृती इराणी हे विजयी झाल्यामुळे भाजपच्या राज्यसभेच्या ३ जागा रिक्त झाल्या आहेत. 

सुषमाजींच्या पावलांवर चालणार, विदेश मंत्री जयशंकर यांचे पहिले टि्वट

केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या पासवान आणि जयशंकर यांना सहा महिन्याच्या आत संसदेच्या दोन्हीपैकी एक सदनाचे सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक आहे. नामांकनानंतर दोन्ही मंत्र्याचे राज्यसभेत जाणे निश्चित आहे. कारण बिहारमध्ये एनडीएकडे पूर्ण बहुमत आहे. तर गुजरातमध्ये तर भाजपचीच सत्ता आहे. 

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील १० प्रमुख चेहरे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयशंकर यांना त्यांचे गृह राज्य तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्याचाही विचार केला जाऊ शकतो. कारण या वर्षी जुलैमध्ये येथील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. भाजपचा सहयोगी पक्ष एआयडीएमकेची येथे सत्ता आहे. पासवान गेल्या अनेक वर्षांपासून संसद सदस्य आहेत. तर प्रशासकीय सेवेतून राजकीय नेते बनलेले जयशंकर यांची संसदेत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. जयशंकर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र सचिव होते.

सुषमा स्वराज यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानताना लिहिले...

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP may field S Jaishankar as Rajya Sabha candidate from Gujarat Ram Vilas Paswan from Bihar