पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणूक : ३० ते ४० टक्के मंत्र्यांना भाजप उमेदवारी नाकारण्याची शक्यता

अमित शहा आणि नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत जरी भाजपला घवघवीत यश मिळाले असले, तरी तीन महिन्यांवर आलेल्या महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास न बाळगण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. या तिन्ही राज्यांमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. तरीही सत्तेतील काही मंत्र्यांविरोधात नाराजी असल्याचे पक्षाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले जाऊ शकते. साधारणपणे सध्याच्या मंत्रिमंडळातील ३० ते ४० टक्के मंत्र्यांना तिकीट नाकारले जाऊ शकते, असे 'लाईव्ह हिंदुस्थान'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता गमावली होती. या राज्यात अनेक मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत अधिक सतर्क राहण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. 

महाजनादेश यात्रेला काँग्रेसचे पोलखोल यात्रेने उत्तर

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. उमेदवारी देताना पक्ष संघटनेकडून मिळालेल्या अंतर्गत अहवालाला महत्त्व देण्यात येईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर उमेदवारीबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल. तिन्ही राज्यांत पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येईल, याचा आम्हाला विश्वास आहे. पण याचा अर्थ सर्व मंत्र्यांना आणि सध्याच्या आमदारांना परत तिकीट दिले जाईल, असे गृहीत धरू नये.