पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BJP च्या दोन आमदारांचे कमलनाथ सरकारच्या बाजूनं मतदान

मध्य प्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसची सत्ता उलटून टाकल्यानंतर भाजप मध्य प्रदेशमध्ये असाच डाव साधणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, मध्य प्रदेशमध्ये भाजपला कर्नाटकसारखा डाव साधणे सहज शक्य होणार नसल्याचे संकेत आहेत.  

मध्य प्रदेश विधानसभेत गुन्हे कायदा (संशोधन) विधेयकावर झालेल्या मतदानावेळी भाजपच्या दोन आमदारांनी कमलनाथ सरकारच्या बाजूने मतदान केल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत: याविषयी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

कमलनाथ म्हणाले की, भाजपकडून सतत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला जातो. पण आज विधानसभेत भाजपच्या दोन आमदारांनी आमच्या बाजूने मतदान केले. उल्लेखनिय आहे की मध्यप्रदेश विधानसभेतील विरोधी पक्ष नेते गोपाल भार्गव यांनी वरून आदेश आला तर कमलनाथ सरकार २४ तासही चालणार नाही, असा दावा केला होता.

 

दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणारे बेकायदा कृत्ये नियंत्रण विधेयक लोकसभेत मंजूर