पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप खासदाराने मोडला सम-विषमचा नियम

विजय गोयल (ANI)

दिल्लीत हवेतील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजपासून 'सम-विषम' व्यवस्था राबवण्यात आली आहे. परंतु, या योजनेच्या पहिल्याच दिवशी राजधानीत भाजपचे नेते विजय गोयल यांनी विरोध करत नियम तोडला. गोयल यांनी सम संख्या असलेली गाडी रस्त्यावर उतरवली. त्यांनी हा अरविंद केजरीवाल यांना सांकेतिक विरोध असल्याचे म्हटले. गोयल यांच्या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत स्वतः विजय गोयल यांच्या घरी गेले. गोयल यांच्या सांकेतिक विरोधाच्या उत्तरादाखल एक फूल भेट देत दिल्ली सरकारच्या मोहिमेत सहभागी होण्याचा आग्रह केला. तर गोयल यांनीही फुलांच्या बदल्यात परिवहन मंत्र्यांना मास्क आणि एक फूल भेट दिले. 

दिल्लीत आजपासून 'सम-विषम' लागू, उल्लंघन केल्यास ४ हजारांचा दंड

विजय गोयल यांनी सम संख्येची गाडी रस्त्यावर आणली आणि दंड भरुन पुन्हा परतले. त्यांनी आपल्या विरोधाची तुलना गांधीजींशी केली. त्यानंतर काही वेळातच कैलाश गेहलोत हे गोयल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना एक फूल भेट दिले. 

सम-विषममुळे गेल्यावेळी काही फायदा झाला नव्हता आणि हे फक्त निवडणुकीपुरते नाटक आहे, असे गोयल म्हणाले. त्यांनी आपल्या गाडीवर सम-विषम एक नाटक असे लिहिले आहे. आधी एकटे केजरीवाल खोकत असत आता संपूर्ण दिल्ली खोकत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

दिल्लीत 'सम-विषम' लागू, उपमुख्यमंत्री सिसोदिया सायकलवर कार्यालयात

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP leader Vijay Goel who left his house in an odd numbered car to protest against Odd Even scheme issued a challan for violation of the scheme