पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उमा भारतींकडून पंतप्रधान मोदींची शिवरायांशी तुलना

उमा भारती

भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करुन मिटलेला वाद पुन्हा उकरुन काढला आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर ट्विटच्या माध्यमातून त्यांनी प्रतिक्रिया दिली असून या ट्विटमध्ये त्यांनी  छत्रपती मोदी जिंदाबाद! अला उल्लेख केला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Delhi Results: 'आप'ने गड राखला; भाजप एक अंकी तर काँग्रेसचा भोपळा!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला असून त्यांना केवळ ८ जागेवर समाधान मानावे लागले आहे. गेल्या दीड वर्षांत देशातील विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुका, त्यानंतर लोकसभा निवडणूक आणि गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या विधानभा निवडणुका यांचे निकाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्याची क्षमता कुणामध्ये नाही हे स्पष्ट होते. देशाच्या जनतेचे मोदींना आणि मोदींनी जनतेला आपलंस केले आहे. छत्रपती मोदी जिंदाबाद! अशा आशयाचं ट्विट उमा भारती यांनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींकडूनही केजरीवालांना शुभेच्छा!

यापूर्वी भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले मोदींशीच काय छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत भाजपला सुनावले होते. अखेर भाजपने पुस्तक मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर हा वाद मिटला होता. उमा भारती यांच्या ट्विटने या वादाला पुन्हा तोंड फुटण्याचे शक्यता आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: bjp leader uma bharti compares pm narendra modi with chhatrapati shivaji maharaj After Delhi Election Results 2020