पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बलात्काराचा आरोप असलेले स्वामी चिन्मयानंद यांना अटक, १४ दिवसांची कोठडी

स्वामी चिन्मयानंद

तरुणीवर केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने भाजपचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना शुक्रवारी सकाळी अटक केली. स्वामी चिन्मयानंद यांना त्यांच्या आश्रमातून ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना लखनऊमधील रुग्णालयात नेले आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर उत्तर प्रदेश पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्वामी चिन्मयानंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्यावर होत असलेल्या आरोपांकडे उत्तर प्रदेश पोलिस गांभीर्याने बघत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. स्वामी चिन्मयानंद भाजपचे नेते असल्यामुळे पोलिस तपासात दिरंगाई करीत असल्याचा आरोप होत होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP leader Swami Chinmayanand has been arrested in connection with the alleged sexual harassment