पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस आमदारांच्या अनुपस्थितीत शिवराजसिंह चौहानांनी सिद्ध केलं बहुमत

शिवराज सिंह चौहान

मध्य प्रदेशमधील राजकीय संकट संपुष्टात आल्याचे दिसून येते. सोमवारी रात्री मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांच्या भाजप सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारच्या बहुमत चाचणीदरम्यान काँग्रेसचा एकही आमदार सभागृहात उपस्थित राहिला नाही. शिवराजसिंह यांनी विश्वासदर्शक ठराव सादर करण्यापूर्वीच विधानसभाध्यक्ष एन पी प्रजापती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

राज्यात कोरोनाचा चौथा बळी, मुंबईत ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी सकाळी सभागृहात विश्वासदर्शक ठराव सादर केला. या ठरावाला भाजपच्या आमदारांनी समर्थन दिले. तर बसपा, सपा आणि अपक्ष आमदरांनीही भाजपच्या बाजूने मतदान केले. दरम्यान, यावेळी काँग्रेसचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. 

शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले. यातील सर्वांत मोठा निर्णय हा जबलपूर आणि भोपाळमध्ये संचारबंदी लागू करण्याचा होता. 

'घाबरु नका, राज्यात ६ महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा

मध्य प्रदेश विधानसभेत भाजपकडे सध्या १०७ आमदार आहेत. त्याचबरोबर २२ आमदारांनी राजीनामा दिला तसेच दोघांचे निधन झाल्याने २४ जागा कमी झाल्या आहेत. या सर्व मतदारसंघात सहा महिन्यांच्या आत निवडणुका होतील. अपक्ष आमदारांशिवाय बहुमतासाठी भाजपला ९ जागांवर विजय आवश्यक आहे. जर सपा, बसपा आणि अपक्षांचा पाठिंबा कायम ठेवायचा असेल तर भाजपला केवळ ५ जागांवर विजय गरजेचा आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP leader Shivraj Singh Chouhan wins confidence motion unanimously in MP assembly for his fourth term