पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जवाहरलाल नेहरु 'गुन्हेगार', कलम ३७० वर शिवराजसिंहांचे वक्तव्य

शिवराजसिंह चौहान, पंडित जवाहरलाल नेहरु

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सुरु झालेले राजकारण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. काँग्रेस सातत्याने मोदी सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे भाजपही पलटवार करताना दिसत आहे. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कलम ३७० वरुन काँग्रेसवर टीका करताना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु हे गुन्हेगार होते, असे वक्तव्य केले आहे. 

कलम ३७०: नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे माध्यमांशी बोलताना शिवराजसिंह यांनी नेहरुंना 'गुन्हेगार'ची उपमा देण्यामागे दोन कारणे सांगितली. ते म्हणाले. पहिले कारण म्हणजे, जेव्हा भारतीय फौजांनी काश्मीरमधून पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करुन सोडत आगेकूच केली होती. नेमके त्याचवेळी नेहरुंनी शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यामुळे काश्मीरचा एक तृतीयांश हिस्सा पाकिस्तानच्या कब्जामध्ये गेला. जर आणखी काही दिवस त्यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली नसती तर संपूर्ण काश्मीर भारताचा हिस्सा असला असता.

शोपियाननंतर डोवाल उतरले अनंतनागच्या ररत्यावर

दुसरे कारण म्हणजे, नेहरुंनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू केले. एक देशात दोन चिन्ह, दोन संविधान आणि दोन पंतप्रधान कसे अस्तित्वात राहू शकतात. हा देशावर अन्यायच नव्हे तर अपराध आहे, असा आरोपही शिवराजसिंह यांनी केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bjp Leader Shivraj Singh Chouhan Says Jawaharlal Nehru Was Criminal Who Imposed Article 370 In Jammu And Kashmir