पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवराज सिंह चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री

शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी रात्री मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी मावळते मुख्

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार कोसळल्यानंतर राज्यात भाजपचे ऑपरेशन लोटसच्या यशस्वी झाले आहे. सोमवारी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत  भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. रात्री ९ वाजता राज्यपाल लालजी टंडन यांनी राजभवनावर त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शिवराज सिंह चौहान यांनी यापूर्वी तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले असून ते चौथ्यांदा राज्याचे नेतृत्व करताना दिसतील.

क्रेडिट कार्ड बिल, EMI वसुली तूर्त टाळावी, चव्हाणांची केंद्राकडे मागणी

शिवराज सिंह चौहान यांच्यासह कोण-कोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेतील, याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. २२ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले होते. बहुमताचा आकडा नसल्यामुळे कमलनाथ यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली.

आता फोनवरुन डॉक्टरांचा सल्ला घेता येणार, पण..

राजीनामा दिलेल्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कार्यकाळ पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करणारे कमलनाथ सरकार कोसळले होते. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर काँग्रेसचे संख्याबळ ९२ वर आले. दुसरीकडे भाजपने १०७ आमदारांच्या जोरावर बहुमताचा आकडा आपल्या बाजूने झुकत मध्य प्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचा संकल्प तडीस नेला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP leader shivraj singh chauhan likely to take oath as Madhya Pradesh CM today after BJP Legislative Party meeting