पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१९४७ मध्येच हिस्सा दिला, भाजपचा ओवेसींवर पलटवार

असदुद्दीन ओवेसी आणि माधव भांडारी

मुसलमानांबाबत टिप्पणी करणारे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर भाजपने पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यानंतर आता महाराष्ट्रातील भाजप नेते माधव भांडारी यांनी ओवेसींवर निशाणा साधला आहे. मुसलमानांना कोणीच भाडेकरु म्हटलेले नाही. जर तुम्ही हिश्श्याबाबत बोलत असाल तर तो तुम्हाला १९४७ मध्येच दिला आहे. त्यामुळे प्रकरण तिथेच संपले आहे, असे स्पष्ट मत भांडारी यांनी व्यक्त केले आहे. शनिवारी एका कार्यक्रमात ओवेसी यांनी मुसलमान हे देशाचे भाडेकरु नाही तर हिस्सेदार आहेत, असे वक्तव्य केले होते. 

माधव भांडारी म्हणाले की, ओवेसींनी विचारपूर्वक बोलले पाहिजे. त्यांना (मुसलमान) कोणीही भाडेकरु म्हटलेले नाही. पण जर ते हिश्श्याबाबत बोलत असतील तर तो १९४७ मध्येच दिला आहे. मग तर हे प्रकरण आता संपुष्टात आले आहे. 

मुस्लिम या देशाचे भाडेकरु नाहीतः ओवेसी

भाजपची सत्ता आली म्हणून देशातील मुसलमानांनी घाबरु नये. मुसलमान देशाचे हिस्सेदार आहेत, भाडेकरु नाहीत. त्यांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा संविधानानुसार मिळाला आहे. जर मोदी मंदिरात जाऊ शकतात तर मुसलमानही मशिदीत जाऊ शकतात, असे वक्तव्य ओवेसी यांनी केले होते. 

ओवेसी यांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही समाचार घेतला होता. काही लोक आपली पोळी भाजण्यासाठी अशा पद्धतीची शेरेबाजी करत असतात. हे लोक धर्म-जाती आणि प्रादेशिकत्वाबाबत वायफळ बडबड करत राहतात. याचा कोणालाच फायदा होत नाही. मोदींवर १३० लोकांचा विश्वास आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली सगळेजण सुरक्षित आहेत, असे ते म्हणाले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp leader madhav bhandari befitting reply to aimim chief asaduddin owaisi over his remarks on muslims