पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काँग्रेसमध्ये जे माझ्या आजीसोबत घडले तेच माझ्यासोबतही झाले'

ज्योतिरादित्य शिंदे

भाजपमध्ये प्रवेश करुन काँग्रेसला मोठा दणका देणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भोपाळमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. भाजप प्रवेशानंतर भोपाळच्या जनतेशी संवाद साधताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर तोफ डागल्याचे पाहायला मिळाले. १९६७ मध्ये काँग्रेसने माझ्या आजीला डावलले होते. त्याचप्रकारे राज्यातील शेतकऱ्यांची बाजू घेतल्यामुळे मलाही डावलण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला आशीर्वाद देत भाजपमध्ये संधी दिली, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर तोफ डागत भाजपच्या कमांडचे कौतुक केले. 

ज्योतिरादित्यांना भाजपात सन्मान मिळणार नाहीः राहुल

ते पुढे म्हणाले. हा क्षण माझ्यासाठी भावनिक आहे. ज्या कुटुंबियांसाठी आणि संघटनेसाठी कठीण परिश्रम केले, ज्यांच्यासोबत २० प्रामाणिक राहून काम केल त्यांना सोडून आता नव्याने प्रवास सुरु करत आहे. शिवराज सिंह यांच्यासोबत राज्याच्या विकासाच्या दृष्टिने जोमाने काम करु, अशा भावना शिंदे यांनी भोपाळच्या जनतेसमोर व्यक्त केल्या.

मंत्री विदेशात जाणार नाहीत, तुम्हीही जाऊ नका, मोदींचा सल्ला

तत्पूर्वी ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसची साथ सोडून भाजपचे कमळ हाती घेतल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधींनीही आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या होत्या. ज्योतिरादित्य शिंदे यांना मी महाविद्यलयीन काळापासून ओळखतो. राजकीय भविष्याच्या चिंतेतून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. विचारधारेसोबत तडजोड करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपकडून त्यांचा सन्मान होणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP leader Jyotiraditya Scindia reached Bhopal a day after joining BJP welcomed by party leaders and supporters