पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप नेत्याने टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण

टोल कर्मचाऱ्याला मारहाण

मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या नेत्याने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. टोलचे पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे भाजप नेत्याने या कर्मचाऱ्यांना मित्रांच्या मदतीने मारहाण केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने ३७ निर्णयांना दिली मान्यता

बाणगंगा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख नरेंद्र सिंह पवार अशी झाली आहे. तो जिल्ह्यातील एका गावातील सरपंचाचा नवरा आणि स्थानिक भाजपचा नेता आहे. तो देखील याआधी सरपंच राहिला आहे.  

माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

पोलिसांनी सांगितले की, पवार आणि त्याचे काही मित्र शनिवारी रात्री इंदूर-उज्जेन मार्गावरील एका टोल प्लाझामध्ये घुसले. त्याठिकाणी असलेल्या टोल कर्मचाऱ्यांना मारहाण केली. टोलचे पैसे मागितल्यामुळे हा वाद झाला होता. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणातील दोन फरार आरोपींचा शोध सुरु आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भास्कर जाधवही शिवसेनेत, शुक्रवारी औपचारिक प्रवेश