नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी रात्री लोकसभेत मंजूर झाले. त्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेमध्ये सादर करण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. बुधवारी हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपने १० आणि ११ डिसेंबर रोजी राज्यसभेतील भाजप खासदारांना व्हिप जारी केला आहे.
Bharatiya Janata Party (BJP) issues whip to its Rajya Sabha MPs to be present in the House on 10th & 11th December. pic.twitter.com/sHlp02RNUI
— ANI (@ANI) December 9, 2019
'आमच्याविरोधात काम करणाऱ्यांचे पुरावे पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द'
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यासंदर्भातील तरतूद भारतीय दुरुस्ती विधेयकामध्ये करण्यात आली आहे. हे विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने ३११ खासदारांनी मतदान केले तर विरोधामध्ये ८० खासदारांनी मतदान केले. तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती