पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार, भाजपचा पलटवार

राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या टि्वटवर भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी हे खोटे बोलणाऱ्यांचे सरदार असल्याचे सांगत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी देशातील जनतेसमोर त्यांची पोल खोल झाल्याचे म्हटले आहे. आरएसएसचे पंतप्रधान खोटे बोलत असल्याचे राहुल गांधींचे हे टि्वट आक्षेपार्ह असल्याचे संबित पात्रा यांनी म्हटले. डिटेंशन कॅम्पबाबत काँग्रेस देशात भ्रम पसरवत असल्याचे पात्रा यांनी म्हटले. 

तुकडे-तुकडे गँगला जनेतेने धडा शिकवावाः अमित शहा

संबित पात्रा म्हणाले की, आज राहुल गांधी यांनी जे काही टि्वट केले आहे, ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग केला आहे, ते खूपच आक्षेपार्ह आहे. राहुल गांधींकडून चांगल्या भाषेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. राफेल प्रकरणी खोटे बोलल्यामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली आहे. आता देशातील जनतेशी ते खोटे बोलत आहेत. 

आता ग्रामविकास, कृषी किंवा सहकारपैकी एक खाते काँग्रेसला हवे

डिटेंशन सेंटरवरुन त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधानांनी म्हटले होते की, एनआरसीनंतर भारताच्या मुसलमानांना ठेवले जाईल, असे एकही  डिटेंशन कॅम्प नाही. यात पंतप्रधानांनी काय खोटे बोलले? १३ डिसेंबर २०११ रोजी केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, ३ डिटेंशन कॅम्प आसाममध्ये सुरु करण्यात आले आहेत. २०११ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. २० ऑक्टोबर २०१२ मध्ये आसामच्या काँग्रेस सरकारने श्वेत पत्रिका जारी केली होती. यामध्ये पान क्रमांक ३८ वर लिहिले होते की, केंद्र सरकारने आसाम सरकारला डिटेंशन सेंटर सुरु करण्याचे निर्देश दिले होते. 

रेल्वे मंत्री म्हणतात, १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलंय

राहुल गांधींना माहीत काहीच करुन घ्यायचे नाही पण सर्वकाही बोलायचं आहे. कोणत्याही विषयाचं राहुल गांधींना ज्ञान नाही. पण प्रत्येक विषयावर त्यांना बोलायचं आहे. त्यांचा उद्देश ना एनपीआर आणि ना सीएए. त्याचा उद्देश हा आहे की, चहावाला कसा पंतप्रधान झाला.

सावित्रीबाई फुलेंनी सोडला काँग्रेसचा हात; स्वत:चा पक्ष स्थापन करणार