पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हरियाणातील सरकार ठरलं! महाराष्ट्रात BJP हाच फॉर्म्युला वापरणार?

अमित शहा यांन हरियाणातील तिढा सोडवला आहे.

भाजपने हरियाणात जेजेपीच्या साथीने सरकार स्थापनेचा तिढा सोडवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची पुष्टी केली आहे. भाजप आणि जेजेपीने एकत्रित येईन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे अमित शहा यांनी सांगितले आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या जननायक जनता पक्षाने भाजपला पाठिंबा दिला आहे. 

सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती

भाजप आणि जेजेपीच्या नेत्यांनी एकत्रित सरकार स्थापन करण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री भाजपचा तर उपमुख्यमंत्री जेजेपीचा या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांनी हरियाणातील तिढा सोडवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढील  ५ वर्ष हरियाणाचा विकास केला जाईल, असेही अमित शहा यावेळी म्हणाले.  हरियाणातील तिढा सोडवण्यासाठी अमित शहा यांनी अहमदाबादचा आपला दौरा रद्द केला. त्यानंतर हरियाणातील चित्र स्पष्ट झाले आहे.    

'हरियाणात सरकार स्थापन्यासाठी भाजपकडून आमदारांची खरेदी सुरुय'

उल्लेखनिय आहे की, महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीतही भाजपला अपेक्षित असे यश मिळालेले नाही. भाजपला २०१४ पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. राज्यात भाजपसोबत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेली शिवसेना काय भुमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष असताना हरियाणात मुख्यमंत्री भाजपकडे आणि उपमुख्यमंत्री सोबत आलेल्या जेजेपीला देण्यात आले. भाजपचा हाच फॉर्म्युला महाराष्ट्रात देखील पाहायला मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.