पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकी तिढाः भाजपची होऊ शकते 'वापसी'

येडियुरप्पा

कर्नाटकातील राजकीय नाटक सोमवारी अजून वेगवान झाले आहे. १३ महिने जुने असलेल्या आघाडी सरकारमधून एक-एक आमदार राजीनामा देत आहेत. काँग्रेस-जेडीएसच्या १३ आमदारांच्या राजीनाम्यानंतर सुरु झालेली राजकीय अस्थिरता थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सोमवारी एका अपक्ष आमदाराने मंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपला आपला पाठिंबा असेल असे जाहीर केले आहे.

अपक्ष आमदार नागेश यांनी राज्यपालांकडे राजीनामा देत कुमारस्वामी सरकारला असलेला आपला पाठिंबा काढून भाजपला समर्थन देत असल्याचे म्हटले. कर्नाटक विधानसभेत एकूण २२४ जागा आहेत. बहुमतासाठी ११३ आमदारांची गरज आहे. काँग्रेस आणि जेडीएस आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभाध्यक्षांसह आमदारांची संख्या ही २१० झाली आहे. एका अपक्ष आमदाराच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस-जेडीएसकडे विधानसभाध्यक्षांना धरुन १०३ आमदार होतात. तर सरकार स्थापन करण्यासाठी १०५ आमदारांची गरज भासेल. कर्नाटकमध्ये भाजपकडे १०५ आमदारांचे समर्थन आहे.

काँग्रेसमधील उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे नेते देवेगौडा यांनी शनिवारी रात्री काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींना सरकार वाचवण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री करण्याचा उपाय सुचवला आहे. सोनिया गांधी यांनी रात्रीच पक्षाच्या कोअर समितीच्या बैठक बोलावली आणि देवेगौडा यांच्या सुचनेवर चर्चा केली. सरकारला वाचवण्यासाठी खरगे यांना कर्नाटकात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत राज्याच्या राजकारणापासून अंतर ठेवणारे खरगे यांनी पक्षाच्या काही असंतुष्ट आमदारांशी संपर्क साधून त्यांची अडचण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

कर्नाटकमधील घडामोडींशी आमचा संबंध नाही - राजनाथ सिंह

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आणखी काही आमदार राजीनामा देऊ शकतात. यामुळे राज्य सरकारवरील संकट आणखी गडद होऊ शकते. काँग्रेस नेत्यांनी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच प्रयत्नाअंर्तगत काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी के सी वेणुगोपाल यांनी काही नेत्यांची भेट घेतली.

आमदार मुंबईत असल्याची माहिती नाही
महाराष्ट्र भाजपने कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस आघाडीचे १० आमदार मुंबईत असल्याचे माहीत नाही, असे रविवारी म्हटले होते. विशेष म्हणजे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, त्याठिकाणी भेट दिली होती.  

- कर्नाटकमधील विधानसभेतील सद्यस्थिती
* २२४ एकूण जागा
* ११३  बहुमतासाठी आवश्यक आमदार

- राजीनाम्यानंतरची स्थिती काय
* २१० आमदार, विधानसभा अध्यक्षांसह
* १०५ आमदार भाजपचे, आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा
* १०४ आमदार सध्या सरकारबरोबर, विधानसभा अध्यक्षांसह
* १०५ आमदारांची सरकार स्थापन करण्यासाठी गरज

कर्नाटकः राजीनामा दिलेल्या ११ आमदारांचा मुंबईत मुक्काम

- २००८ मधील स्थिती
* १२० आमदारांसह कुमारस्वामी सरकार सत्तेवर
* ८० काँग्रेस. ३७ जेडीएस. १ बसपा, २ अपक्ष आमदार सत्तेत
* १०४ आमदार भाजपचे

- सातत्याने आमदारांच्या संख्येत घट
* २ काँग्रेस आमदारांनी १ जुलैला राजीनामा दिला. एकाची पक्षातून हकालपट्टी
* १ जागा (चिंचोली) पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसकडून खेचली
* १३ आमदारांनी शनिवारी विधानसभेचा राजीनामा दिली.
भाजप सत्तेसाठी तयार; काँग्रेसचे बंडखोर आमदार सिद्धरामय्यांच्या बाजूने

 

(स्त्रोतः लाइव्ह हिंदुस्थान)

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP government can return in Karnataka know the math after JDS-cngress and Independent MLAs resign