पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभेसाठी एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप, काँग्रेसचा फायदा आणि तोटाही!

राज्यसभा

राज्यसभेतील ५१ सदस्य येत्या एप्रिल महिन्यात निवृत्त होत आहेत आणि तेवढ्याच जागा नव्याने निवडून येणार आहेत. राज्यसभेच्या या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांनाच सर्वाधिक फायदा होईल. या दोन्ही पक्षांचे सर्वाधिक सदस्य निवडून या सभागृहात येतील. अर्थात असे असले तरी या दोन्ही पक्षांचे राज्यसभेतील एकूण पक्षीय बल काही प्रमाणात कमी होणार आहे.

अमेरिकेने सुलेमानीला ज्या ड्रोन तंत्रज्ञानाने मारले तेच भारताला हवंय

एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेस या दोन्ही पक्षांचा फायदा होणार आहे. लोकसभेत स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपकडे अद्याप राज्यसभेत बहुमत नाही. एप्रिलमधील निवडणुकीनंतरही भाजपकडे बहुमत असणार नाहीच. तरीही त्यामुळे भाजपवर फारसा फरक पडणार नाही. कारण बहुमत नसतानाही भाजपने इतर पक्षांच्या मदतीने महत्त्वाची विधेयके राज्यसभेत मंजूर करून घेतली आहेत. 

भाजपचे राज्यसभेत ८२ सदस्य आहेत. निवडणुकीनंतर त्यांचे १३ सदस्य विविध राज्यांतून या सभागृहात निवडून येऊ शकतात. ओडिशातील रिक्त होणाऱ्या एकूण तीन जागांपैकी दोन जागांवर बिजू जनता दलाचे उमेदवार विजयी होऊ शकतात. तिथे भाजपला एक जागा मिळू शकते. आंध्र प्रदेशमधील रिक्त होणाऱ्या सर्व चार जागा वायएसआर काँग्रेसच्या वाट्यालाच जाणार आहेत.

हिमाचल प्रदेश आणि हरियाणा येथूनही भाजपला प्रत्येक एक सदस्य निवडून आणणे शक्य आहे. काँग्रेसचे सध्या राज्यसभेत ४६ सदस्य आहेत. एप्रिलमधील निवडणुकीत त्यांना १० जागा निवडून आणता येऊ शकतात. पक्षाचे एकूण ११ सदस्य एप्रिलमध्ये निवृत्त होताहेत. 

बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी दोन नव्या इमारती

एप्रिलमध्ये राज्यसभेत महाराष्ट्रातून सात, तामिळनाडूतून सहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधून प्रत्येकी पाच, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधून प्रत्येकी चार, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशामधून प्रत्येकी तीन, झारखंड आणि छत्तीसगढमधून प्रत्येकी दोन तर आसाम, मणिपूर, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक सदस्य निवृत्त होत आहेत.