पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवाराला धू-धू धुतले

भाजप उमेदवाराला मारहाण

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकी दरम्यान हिंसाचाराची घटना समोर आली आहे. करीमपूर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुकी दरम्यान भाजपचे उमेदवार जय प्रकाश मजूमदार यांना काही जणांनी मारहाण केली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप जय प्रकाश यांनी केला आहे.

करीमपूर मतदार संघातील नदिया जिल्ह्यातील फीपुलखोला भागामध्ये मतदान केंद्रावर दाखल होताच जय प्रकाश यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही जण भाजप उमेदवार जय प्रकाश यांना मारहाण करत त्यांना रस्त्याच्या शेजारी असलेल्या झाडांमध्ये ढकलून देताना दिसत आहे. या हल्ल्याच्या मागे तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

पदभार स्वीकारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी केले हे काम

भाजपने या घटनेची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजप नेते मुकुल रॉय यांनी निवडणूक आयोगाला या घटनेमध्ये ताबडतोब हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत सांगितले की, 'टीएमसीच्या ५० गुंडांनी भाजपचे उमेदवार जय प्रकाश यांना घेरले. धक्का-बुक्की करत त्यांना बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांविरोधत ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

पुण्यात शिवशाही बस ५० फूट दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू