पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : ... तर दारुचा आणि दंड भरण्याचा प्रश्न आपोआप मिटेल, भाजपचा उमेदवार बरळला

दुदाराम बिष्णोई

आमदार होण्यासाठी कोण काय आश्वासन देईल, याचा काही नेम नाही. सभेमध्ये आपण काय बोलतोय, याचे भानही काही जणांना नसते. असे एक उदाहरण हरियाणामध्ये बुधवारी घडले. हरियाणातील फतेहाबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दुदाराम बिष्णोई यांनी भर सभेत मतदारांना भलतीच आश्वासने देऊन टाकली. त्यांच्या या आश्वासनांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. एएनआयने या संदर्भातील व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रसारित केला आहे.

काँग्रेसला आत्मचिंतनाची गरजः ज्योतिरादित्य शिंदे

दुदाराम बिष्णोई यांनी भरसभेमध्ये बोलताना सांगितले की, तुम्ही जर मला इथून आमदार म्हणून निवडून दिले. तर मद्यपानाचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, मोटारस्वारांना दंड केला जाण्याचा प्रश्न अशा छोट्या-मोठ्या अडचणी आपोआप संपून जातील. बिष्णोई यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते हिंदीतून वरील आश्वासने देताना दिसतात.

विधानसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्याच उमेदवाराकडून अशी आश्वासने देण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.