पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपची काँग्रेस, शिवसेनेवर टीका; पण राष्ट्रवादीबद्दल ब्र सुद्धा नाही

रविशंकर प्रसाद आणि भाजपचे इतर नेते

महाराष्ट्रात एका रात्रीत राष्ट्रपती राजवट मागे घेऊन अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या साह्याने सरकार स्थापन केल्यावरून विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका केली जाते आहे. याला नवी दिल्लीमध्ये भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जाते आहे. पण विशेष म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार यांच्याबद्दल भाजपचे नेते ब्र सुद्धा काढत नाहीत हे विशेष.

महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या, राहुल गांधींचा घणाघाती आरोप

रविशंकर प्रसाद यांनी संसद भवनाच्या प्रवेशद्वार क्रमांक चारजवळ पत्रकारांशी संवाद करताना सांगितले की, लोकशाहीची हत्या कोणी केली, शिवसेना आणि काँग्रेसनी. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला जनादेश मिळाला होता आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार होते. तरीही कोणी जनादेशाची चोरी करण्याचा प्रयत्न केला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ज्योतिरादित्य शिंदें यांच्या टि्वटर परिचयातून काँग्रेस 'गायब'

गेल्या शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे राज्यात राजकीय भूंकप आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार फुटल्यामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले होते. याच मुद्द्यावरून सोमवारी काँग्रेसने संसद भवनाबाहेर निदर्शने केली. त्याचबरोबर लोकसभा आणि राज्यसभेतही जोरदार घोषणाबाजी केली.