पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चित्रपटाला अनुदान मिळाले नाही म्हणून अनुराग कश्यपकडून विरोध'

अनुराग कश्यप

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक अनुराग कश्यप नेहमी भाजप सरकारविरोधात आंदोलन करण्यात अग्रेसर असतात. मोदी सरकारविरोधक अशीच त्यांची ओळख आहे. सोशल मीडियावरही सरकारविरोधात ते सातत्याने पोस्ट करत असतात. आता भाजपने त्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमधील तत्कालीन अखिलेश सरकारने कश्यप यांना मसान चित्रपट निर्मितीसाठी २ कोटी रुपये दिले होते. आता अशीच रक्कम कश्यप हे सांड की आंख आणि मुक्केबाजसाठी मागत असल्याचा आरोप भाजपने केली आहे. 

भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले की, अनुराग कश्यप यांच्या मोदी द्वेषाचे कारण आता समोर आले आहे. अनुराग हे असेच पैसे गोळा करतात, असेही त्यांनी म्हटले.

धार्मिक आधारावर देशात फूट पाडणे हाच CAA चा उद्देश : सोनिया गांधी

याबाबत भाजपने तीन पानांचे पत्र जारी केले आहे. हे पत्र सदस्य सचिव, माहिती आणि संपर्क विभाग, उत्तर प्रदेशचे आहे. पहिल्या पत्रात स्पष्टपण लिहिले आहे की, अनुराग कश्यप यांच्या ११ डिसेंबर २०१४ च्या पत्राच्या उत्तरादाखल उत्तर प्रदेशच्या माहिती संपर्क विभागाने १ मार्च २०१५ रोजी २ कोटी रुपये देण्याची शिफारस केली आहे. 

ममतांदीदींनी PM मोदींना सांगितली 'मन की बात', पण...

पत्रात लिहिले आहे की, मसान चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकूण ८ कोटी रुपये खर्च आला. चित्रपटाचे ९७ टक्के छायाचित्रण हे उत्तर प्रदेशात झाले. यासाठी उत्तर प्रदेशच्या माहिती विभागाने चित्रपट धोरणानुसार चित्रपटाच्या एकूण खर्चाच्या २५ टक्के रक्कम दिली. सांड की आंख चित्रपटाच्या संदर्भात अनुराग कश्यप यांच्या अनुदान देण्याबाबतच्या पत्राचे उत्तर देताना माहिती आणि संपर्क विभागाने २८ सप्टेंबर २०१८ मध्ये लिहिलेल्या पत्रात सरकारच्या चित्रपट धोरणानुसार आपला चित्रपट नसल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. 

अगदी अशाच पद्धतीने आणखी एक पत्र माहिती विभागाने मुक्केबाज चित्रपटासंदर्भात १३ डिसेंबर २०१९ ला अनुराग कश्यप यांना लिहिले आणि अनुदान देण्यास नकार दिला. या पत्राच्या माध्यमातून भाजपने अनुराग कश्यप यांच्यावर निशाणा साधल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवर अनुराग कश्यप मोदी सरकारविरोधात आहेत.

चिंचवडमध्ये फडणवीस म्हणाले, 'मी पुन्हा येईन'