पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अवघ्या दोन वर्षात भाजपचे साम्राज्य निम्मे झाले; पहा नकाशा

भाजपची सत्ता

केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाची साम्राज्य गेल्या काही वर्षांत हळू हळू कमी होत चालले आहे. देशातल्या सर्वाधिक राज्यांवर सत्ता असलेल्या भाजपची सत्ता अवघ्या दोन वर्षात अर्ध्यावर आली आहे. गेल्या दोन वर्षात भाजपाने अनेक मोठ्या राज्यातील सत्ता गमावली आहे. ज्या राज्यात भाजपचे सरकार बर्‍याच काळापासून कार्यरत आहे त्या ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला आहे. 

 

'झारखंडमध्ये आजपासून नवा अध्याय सुरु होईल'

वरती दिलेल्या नकाशामध्ये पाहू शकता की, डिसेंबर २०१७ पर्यंत देशातील ७१ टक्के भागावर भाजपचे राज्य होते. मात्र, डिसेंबर २०१९मध्ये  सर्वाधिक ठिकाणी भाजपच्या हातून सत्ता निघून गेली. आता भाजप फक्त ३६ टक्के भागावर राज्य करत आहे. आता देशामध्ये फक्त ३६ टक्के भागावर भाजपची सत्ता आहे. 

झारखंड निकालानंतर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया

२०१४ मध्ये फक्त ७ राज्यांमध्ये भाजपचे सरकार  होते. मोदी लाटेमुळे भाजप एकामागून एक राज्य जिंकत गेले. २०१५ मध्ये भाजपने १३  राज्यांवर सत्ता स्थापन केली. २०१६ मध्ये १५ राज्यांवर सत्ता स्थापन केली. २०१७ मध्ये भाजपाने १९ राज्यांवर सत्ता स्थापन केली. तर, २०१८ पर्यंत भाजपने २१ राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन केली होती. 

'झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला'

मात्र, २०१८ मध्ये भाजपचा विजय रथ थांबला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या हातू सत्ता गेली. आंध्रप्रदेशमध्ये भाजपने टीडीपीचे समर्थन काढून घेत सरकारमधून बाहेर पडले. जम्मू-काश्मीरमध्ये देखील भाजपने पीडीपीचे समर्थन काढून घेत सत्ता गमावली. यावर्षी माहाराष्ट्र आणि झारखंडमध्ये देखील भाजपच्या हातून सत्ता गेली आहे.

धक्कादायक: तरुणाने स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bjp after jharkhand election result shrinking saffron how india map has changed in the past 2 years