पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा

बिल गेट्स

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे ते आता लोककल्याणाच्या कार्यात स्वत:ला झोकून देणार आहेत. 

कोरोनामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराकडूनही महत्त्वाची खबरदारी

 १९७५ मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. २००० पर्यंत ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला असला तरी ते मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.

खातेधारकांना दिलासा, येस बँकेवरील निर्बंध तीन दिवसांत हटणार

बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या १२ झाली आहे. शुक्रवारी त्यांनी संचालक मंडळातून पायउतार होत असल्याचा निर्णय जाहीर केला. ते आता पूर्ण वेळ त्यांच्या  बिल गेट्स संस्थेसाठी झोकून काम करणार आहे. या संस्थेद्वारे ते समाजसेवेवर जास्तीत जास्त वेळ खर्च करणार आहेत.