मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांना मागे टाकत श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून जेफ बेजॉस हे जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल आहेत.
तिसऱ्या दिवशीच 'शेर ए बांग्ला' ढेर! भारताचा 'विराट' विजय
'क्लाइड कम्प्युटिंग' संदर्भातील १० अब्ज डॉलरचं कंत्राट मिळवण्यात मायक्रोसॉफ्टला यश आल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे शेअर्स ४%नी वधारले. 'पेंटागन'कडून 'क्लाउड कम्प्युटिंग'चं कंत्राट मिळवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉनमध्ये तीव्र स्पर्धा होती. २५ ऑक्टोबरला आश्चर्यकरित्या 'पेंटागन'नं मायक्रोसॉफ्टला कंत्राट दिले. या निर्णयानंतर मायक्रोसॉफ्टला याचा खूप मोठा फायदा झाला परिणामी बिल गेट्स यांच्या संपत्तीतही वाढ झाली.
अयोध्यावर निर्णय देणाऱ्या सरन्यायाधीश गोगोईंना झेड प्लस सुरक्षा
सध्या बिल गेट्स यांची संपत्ती ही ११० बिलियन डॉलर आहे तर जेफ बेजॉस यांची संपत्ती १०८ बिलियन डॉलर आहे. गेल्या महिन्यात देखील गेट्स यांनी बेजॉस यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले होते. 'ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्स' च्या आकडेवारीनुसार तिसऱ्या क्रमांकावर युरोपमधील उद्योजक बर्नाड अर्नाल्ट आहे.