पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये कोरोना विषाणू: चीनवरुन आलेल्या विद्यार्थिनीत आढळली लक्षणे

कोरोना विषाणू

बिहारच्या सारण जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणीला  कोरोना विषाणूंची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही तरुणी चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी ती बिहारला परत आली. तिला उपचारासाठी बिहारच्या पाटणा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चीनमध्ये भीषण परिस्थिती; कोरोनामुळे रात्रीत २४ जणांचा मृत्यू

सारण येथील सिव्हिल सर्जन मधेश्वर झा यांनी सांगितले की, छपरा नगर येखील २२ वर्षीय तरुणी चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ती २२ जानेवारी रोजी घरी आली. या तरुणीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला दोन दिवसांपूर्वी छपरा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. या तरुणीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

'दहा रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस'

मधेश्वर झा यांनी पुढे असे सांगितले की, तरुणीला उपचारासाठी दाखल केल्यानंतर रुग्णालयात पूर्ण दक्षता घेण्यात आली आणि डॉक्टरांच्या पथकाने तिची तपासणी केली. तिची प्रकृती जास्त खालावल्यामुळे  रविवारी संध्याकाळी तिला चांगल्या उपचारासाठी पाटणा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

सात क्षेत्रांत साडेतीन कोटी लोक बेरोजगार, प्रियांका गांधींचा हल्ला

दरम्यान, चीनच्या वेगवेगळ्या प्रांतात झपाट्याने पसरलेला आणि जीवघेणा कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ८० लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले आतापर्यंत २ हजार ४५४ रुग्ण आढळले आहेत. तर जगभरामध्ये २ हजार ५०४ जणांना हा विषाणूची लागण झाल्याचा अहवाल समोर आला आहे. 

'टीका करण्यासाठी नाही तर लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण'