पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहार : पूराच्या तडाख्यात २७ जणांचा मृत्यू, CM म्हणाले...

नितीश कुमार

अतिवृष्टीमुळे बिहारमधील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. याठिकाणी पावसाने आतापर्यंत २७ जणांचा बळी घेतलाय. जीवनावश्यक वस्तू आणि सेवावर देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव झाल्याचे दिसत आहे. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नागरिकांपर्यंत मदत पोहचवली जात असल्याचे म्हटले आहे. 

'आप'ची दुसरी यादी जाहीर, पु्ण्यातील दोन उमेदवारांचाही समावेश

नितीश कुमार म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे गंगा नदीची पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नैसर्गिक आपत्तीला कोणी काहीच करु शकत नाही. हे कोणाच्याही हातात नसते. पूरग्रस्तांना पिण्याच्या पाण्यासह खानपानासाठी सामूहिक व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.  

अन् पूरात अडकलेल्या ट्रकातील १२ शालेय विद्यार्थीनींचा जीव

उल्लेखनिय आहे की, रेल्वे रुळावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवाही ठप्प झाली आहे. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी हावडाहून अमृतसरच्या दिशेने जाणारी पंजाब मेल आसनसोल-प्रधान खाटा-गया-पं. दीन दयाल उपाध्याय मार्गावरुन वळवण्यात आली. याशिवाय मालदा टाउन-दिल्ली मार्गावर धावणारी  फरक्का एक्सप्रेस किऊल जं.-गया-पं. दीन दयाल उपाध्याय मार्गावरुन वळवण्यात आली.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bihar facing flood condition nitish kumar says its natural disaster we are helping people