पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मानहानी प्रकरणः पाटणा न्यायालयाने राहुल गांधींना दिला जामीन

राहुल गांधी

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे शनिवारी पाटणा सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना १०-१० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला. जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपली लढाई ही संविधान वाचवण्यासाठी सुरु असल्याचे म्हटले. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

राहुल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, भाजप आणि आरएसएस मला त्रास देत आहेत. ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. यासाठी जिथे-जिथे मला जावे लागेल. तिथे मी जाईन.

राहुल गांधी यांनी न्यायालयात जाण्यापूर्वी टि्वट केले होते. मी पाटणाच्या न्यायालयात दोन वाजता जात आहे. आरएसएस/भाजप माझ्या राजकीय विरोधकांच्या माध्यमातून मला त्रास देण्यासाठी. धमकीसाठी दाखल केलेला हा आणखी एक खटला, 'सत्यमेव जयते', असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bihar Deputy Chief Minister Sushil Kumar Modi defamation suit Rahul Gandhi gets bail from Patna court