पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेंदूज्वरामुळे बिहारमध्ये ३१ बालकांचा मृत्यू

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे ३१ बालकांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे ३१ बालकांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते २ जूनपर्यंत १३ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. २ जून ते आजपर्यंत ८६ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. यापैकी ३१ जणांचा मृत्यू झाल्याचे श्री कृष्णा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (एसकेएमसीएच) मुझफ्फरपूरचे अधीक्षक सुनील शाही यांनी सांगितले.  जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील बहुतांश वॉर्ड हे बालकांनी भरले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील बालकांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. 

जहाल नक्षलवादी नर्मदाला हैदराबादमधून अटक

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बालकांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि मेंदूज्वरावरील उपायाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या एका पथकाला मुझफ्फरपूरला पाठवण्यात आल्याची माहिती नितीशकुमार यांनी दिली.

नितीशकुमार म्हणाले की, लोकांमध्ये या आजाराशी कसा सामना करावा याची माहिती नसल्याचे दिसते. मागील दोन वर्षांत यामध्ये घसरण झाली होती. पण यावेळी या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. जागरुकता अभियान व्यवस्थित राबवण्यात आले नव्हते. लहान मुलांना उपाशीपोटी झोपू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

हवाई दलाच्या बेपत्ता AN 32 विमानाचे अवशेष सापडले

केंद्र सरकारनेही एका विशेष उच्चस्तरीय पथकाची नेमणूक केली आहे. ही समिती मुजफ्फरपूरमध्ये या आजारावर निंयत्रण मिळवण्यासाठी मदत करेल.