पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये पुरात अडकलेल्या १०० भाविकांचे वाचवले प्राण

प्रातिनिधिक छायाचित्र

बिहारमध्ये धबधब्याची पाणी पातळी अचानक वाढल्यामुळे १०० जण अडकले होते. त्यांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना बिहारच्या रोहतास येथील आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक तुतला भवानी देवीच्या दर्शनासाठी आहे होते. मात्र याठिकाणी असलेल्या धबधब्याची पाणी पातळी अचानक वाढली आणि नदीला पुर आला यामुळे १०० भाविक अडकले होते. 

तुतला भवानी मंदिराच्या शेजारी असणाऱ्या कैमुर डोंगरावरून धबधबा वाहतो. या धबधब्याची पाणी पातळी सोमवारी दुपारी अचानक वाढली त्यामुळे नदीला पूर आला. पूर आल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक अडकले. या परिसरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याची पाणी पातळी वाढली आणि पूर आला. सोमवार असल्याने अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी आले होते.

पूरामध्ये भाविक अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पावसामुळे नदीची पाणी पातळी दुपटीने वाढली होती त्यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. मात्र दोरीच्या साहाय्याने आणि मानवी साखळी बनवून या भाविकांचे प्राण वाचवण्यात आले.