पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीमा-कोरेगाव हिंसाचार : तेलतुंबडे, नवलखा यांच्या अडचणीत वाढ

सर्वोच्च न्यायालय

भीमा कोरेगावर हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांकडून दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्या अडचणीत सोमवारी वाढ झाली. या दोघांची अटकपूर्व जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. त्यामुळे या दोघांची अटक आता अटळ झाली आहे.

राहुल गांधींनी मागितली ५० कर्जबुडव्यांची नावे

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात अटकपूर्व जामीन फेटाळला. त्याचबरोबर या दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांपुढे शरण येण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. या कालावधीत दोघांनाही पुणे पोलिसांपुढे हजर व्हावे लागणार आहे. या दोघांनाही आपले पासपोर्ट पुणे पोलिसांकडे देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

गेल्या महिन्यातच या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

Video: सचिनच्या शतकांच्या शतकाचा अन् गिब्जच्या आतषबाजीचा दिवस

पुणे पोलिसांनी १ जानेवारी २०१८ ला पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंसक माओवाद्यांशी संपर्क आणि इतर आरोपांतर्गत गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे आणि इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ३१ डिसेंबर २०१७ ला पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण देण्यात आली होती. यामुळे दुसऱ्या दिवशी भीमा-कोरेगाव येथे जातीय दंगल भडकली होती, असे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bhima Koregaon case Supreme Court rejects anticipatory bail plea of activists Gautam Navlakha and Anand Teltumbde