पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राजधानी दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष होते. पण पोलिसांना चुकवून निघून जाण्यात ते यशस्वी ठरले होते.

फडणवीसांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत, शिवसेनेची टीका

शुक्रवारी दर्यागंज भागात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ४० जणांना ताब्यात घेतले. यामध्ये तीन अल्पवयीनांचाही समावेश आहे. दर्यागंजमध्ये शुक्रवारी सकाळपासून शांततेत आंदोलन सुरू होते. पण संध्याकाळी त्याला हिंसक वळण लागले. ज्यावेळी तिथे आंदोलन सुरू होते. त्यावेळी आपण जामा मशिदीमध्ये होतो, असे चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा मागे घेतला जावा, यासाठी आपल्याला बलिदान करावे लागणार आहे. हिंसेचे आम्ही समर्थन करीत नाही. शुक्रवार सकाळपासून आम्ही जामा मशिदीमध्येच होतो. हिंसेमध्ये आमच्या संघटनेच्या लोकांचा समावेश नाही, असे चंद्रशेखर आझाद यांनी पीटीआयला सांगितले.

NRC संदर्भात गृह मंत्रालयाची महत्त्वाची माहिती, हे पुरावे आवश्यक नाही

दर्यागंजमध्ये हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि आंदोलकांवर पाण्याचा फवारा केला. या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत ४६ जण जखमी झाले आहेत.