पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Bharat Bandh: काही बँका बंद राहणार, ATM सेवा विस्कळीत होण्याची चिन्हं

कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने भारत बंदचे आवाहन केले आहे.

देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आज (बुधवारी) ८ जानेवारी रोजी देशव्यापी संप आणि आंदोलन पुकारले आहे.  सरकारने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या आंदोलनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या दहा प्रमुख संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. या बंदमध्ये २५ कोटी लोक सहभागी होणार असल्याचा दावा देखील संघटनांच्यावतीने करण्यात आला आहे.  

JNU कँम्पस परिसरातील आंदोलनात अभिनेत्री दीपिकानेही लावली हजेरी

कामगार, जनता आणि राष्ट्र विरोधी धोरणांच्या विरोधात हे व्यापक आंदोलन करण्यात येणार असून सरकारने चुकीचे धोरणे मागे घ्यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. एका कार्यालयाने जाहिरातीच्या माध्मयातून कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले होते. एवढेच नाही तर या आंदोलनात सहभागी झाल्या वेतन कपातीशिवाय अनुशासनात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे भारत बंदला नेमका कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

निर्भयाच्या दोषींना गय नाही, २२ जानेवारीला ७ वाजता होणार फाशी

आज बहुतांश बँका बंद राहण्याची शक्यता आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांचा विरोध करण्यासाठी डाव्या पक्षांबरोबरच विरोधीपक्षांशी संबंधित कामगार संघटनांनी बंदची हाक दिली आहे. बँक कर्मचारी संघटनांनी देखील या संपाला पाठिंबा दर्शवला असल्याने एटीएम सेवांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने  बंद दरम्यानही बँकेचे व्यवहार सुरु राहतील असं स्पष्ट केलं आहे.  मात्र अनेक लहान मोठ्या बँकांच्या ग्राहकांना या बंदचा फटका बसणार आहे.