पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाउनमध्ये घराबाहेर काढलेल्या तरुणीला भूतियाने दिला मदतीचा हात

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायुचंग भूतिया

लॉकडाउनच्या काळात नागरिकांना आर्थिक कोंडीला देखील सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत घरमालकांनी भाडेकरुला भाडे देण्यास पैसे नसल्यामुळे घराबाहेर काढू नये, अशा सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत.  कोलकातामधील सिलीगुडी येथे एका घरमालकाने कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरुन भाडेकरुला घराबाहेर काढण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चक्क भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायुचंग भूतियाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

IMF ने पाकला दिलेल्या १.४ अब्ज डॉलर मदतीच्या निर्णयावर भारताची नाराजी

सिक्किमची मूळ रहिवाशी असलेल्या अथिना लिंबू नावाच्या तरुणीला सौम्य ताप असल्याच्या कारणावरुन घरमालकाने तिला घराबाहेर काढले. अथिनाला तीन-चार तास मदतीशिवाय इकडे तिकडे भटकावे लागले. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर भूतियाने आपल्या मित्रांच्या साथीने संबंधित तरुणीला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यामध्ये कोरोनची कोणतीही लक्षणं नसून सामान्य ताप असल्याचे तपासणीनंतर सांगितले. भूतिया आणि त्याच्या मित्रांनी मिळून तरुणीची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. पूर्ण पणे बरी झाल्यानंतर आपल्या भाड्याच्या घरी परतलेल्या तरुणीला घरमालकाने लॉकडाउननंतर येण्यास सांगत घरात प्रवेश करण्यास मनाई केली. 

देशातील मोठ्या आर्थिक घडामोडींचे जिल्हेच कोरोना हॉटस्पॉट

फुटबॉलर आणि हमरो सिक्किम पार्टीचे संस्थापक असणाऱ्या भूतियाने ही घटना दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. कठीण परिस्थितीत लोक एकमेकांची मदत करताना दिसत नाहीत. सिक्किमची तरुणाई खूप वाईट अनुभवातून जात आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस तिला न्याय देतील, अशी आशा  भूतियाने व्यक्त केली आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bhaichung Bhutia has filed a police complaint against landlord who allegedly evicting teenager from her rented accommodation