पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलाला गळफास लावण्यास मदत केल्यावरून बंगळुरूमध्ये वडिलांना अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

लोकांकडून घेतलेले पैसे चुकवता येत नसल्यामुळे कुटुंबातील सगळ्यांनी मिळून आत्महत्या करण्याचे केलेले नियोजन एका कुटुंबप्रमुखास महागात पडले आहे. मुलाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त आणि मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. बंगळुरूमध्ये ही घटना घडली.

या प्रकरणातील आरोपीचे नाव सुरेश बाबू असे आहे. तो आणि त्याची पत्नी गीताबाई यांनी आसपासच्या लोकांकडून कर्जरुपी पैसे घेतले होते. पण ते त्यांना परत करता येणार नव्हते. त्यामुळे या दोघांनी मिळून संपूर्ण कुटुंब संपविण्याचा निर्णय घेतला. १७ वर्षांची मुलगी आणि १२ वर्षांचा मुलगा यांच्यासह चौघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 

सुरेश बाबू यांनी सुरुवातीला त्यांच्या मुलाला गळफास लावण्याची तयारी केली. पण त्यांच्या मुलीने हे सर्व बघितल्यावर तिने आई-वडिलांना विरोध केला. तिने वडिलांनाही आत्महत्या करण्यापासून रोखले. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, संबंधित कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यांनी आसपासच्या लोकांकडून घेतलेली देणीही त्यांना देता आली नाहीत. लोकांकडून सातत्याने बोलणी खावी लागत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 

सुरेश बाबू आपल्या मुलाला गळफास लावण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या मुलीने केलेले शूटिंग एका कन्नड वृत्तवाहिनीला मिळाले. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पाच शेजाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.