पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी अधीर रंजन चौधरी

अधीर रंजन चौधरी

पश्चिम बंगालमधील बेऱ्हामपोर लोकसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून आलेले अधीर रंजन चौधरी यांची काँग्रेसने लोकसभेतील गटनेते म्हणून निवड केली आहे. 

काँग्रेसच्या संसदीय दलाच्या कोअर समितीची बैठक मंगळवारी सकाळी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झाली. खूप वेळ चाललेल्या या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाकडून लोकसभेच्या महासचिवांना अधीर रंजन चौधरी यांचे नाव सुचविण्यात आले. लोकसभेमध्ये पक्षाच्या सर्व कामांचे नेतृत्त्व अधीर रंजन चौधरी करणार आहेत.

Maharashtra Budget : 'सबका साथ' मिळण्यासाठी 'सबका भला' अर्थसंकल्प!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष तिवारी, शशी थरूर, के. सुरेश यांच्याही नावाची गटनेता म्हणून समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर राहुल गांधी यांनीच लोकसभेमध्ये पक्षाचे नेतृत्त्व करावे, यावरही चर्चा झाली. अखेर अधीर रंजन चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

पूर्वेकडील राज्यांमध्ये अधिक चांगली कामगिरी करता यावी, यासाठी ही निवड करण्यात आली असल्याचे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. पक्षाचे अध्यक्ष दक्षिणेतील राज्यातून निवडून आले आहेत. पण आता पूर्वेकडील राज्यांमध्येही पक्षाला विस्तार करण्याची गरज आहे. त्यासाठीच अधीर रंजन चौधरी यांच्या नावाची निवड करण्यात आली, असे या नेत्याने स्पष्ट केले.