पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश

झारखंडमध्ये विरोधकांना झटका, विरोधी पक्षातील ६ आमदारांचा भाजपत प्रवेश

झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षांना झटका दिला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु, विरोधी नेत्यांचे पक्ष बदलण्याचे सत्र सुरु झाले आहे. प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह सहा आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे. सुखदेव यांचा भाजपत प्रवेश म्हणजे काँग्रेसला निवडणुकीपूर्वीचा हा मोठा धक्का मानला जात आहे. 

'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा

रांचीमध्ये मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत सर्व सहा आमदारांनी भाजपचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले. भगत यांच्यासह मनोज यादव (काँग्रेस), जेपी भाई पटेल (जेएमएम), चमरा लिंडा (जेएमएम) आणि भानू प्रताप शाही (नौजवान संघर्ष मोर्चा) आणि कुणाल सारंगी (जेएमएम) हे भाजपत दाखल झाले.

गेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा?

सुखदेव भगत आणि मनोज यादव हे पूर्वीपासूनच भाजपच्या संपर्कात होते. भगत हे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रामेश्वर उरांव यांच्यावर नाराज होते. मनोज यादव यांनी चतरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. जेएमएमचे निलंबित आमदार जेपी भाई पटेल हेही भाजप सहभागी झाले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता.

विधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर

झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी भाजप विरोधी पक्षांच्या अनेक आमदारांना आपल्या तंबूत आणण्याची शक्यता आहे. पक्षाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री रघुबर दास सध्या 'जन आशीर्वाद यात्रा'च्या माध्यमातून जनसंपर्कात व्यस्त आहेत.