पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शपथविधीपूर्वी मंत्रिमंडळातील सर्वांना नरेंद्र मोदी निवासस्थानी भेटणार

नरेद्र मोदी आणि अमित शहा

देशातील जनतेने पुन्हा एकदा स्पष्ट कौल देत भाजपला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिले. याच यशाची औपचारिक सोहळा म्हणजे शपथविधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत असलेल्या सरकारचे केंद्रात प्रतिनिधित्व करणार आहेत. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात नरेंद्र मोदी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना शपथ देतील.   

नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने केलेल्या प्रचाराच्या बळावर भाजपने एकहाती लोकसभेत ३०३ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांसह ३५२ चा आकडा गाठला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजधानीमध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार याची चर्चा गतिमान झाली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने बैठक होत असून, आता नावे निश्चितही झाली आहेत.

LIVE UPDATES

निरंजन ज्योती यांना अमित शहांचा फोन, पंतप्रधानांच्या निवासस्थानी येण्याचे निमंत्रण - एएनआय

जितेंद्र सिंह, नित्यानंद राय यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी येण्याचे निमंत्रण - एएनआय

अर्जुन राम मेघवाल यांना अमित शहांचा फोन, शपथविधीसाठी येण्याचे निमंत्रण - एएनआय

प्रकाश जावडेकर साडेचार वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित राहणार - एएनआय

संतोष गंगवार यांना अमित शहांचा फोन, साडेचार वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावेल - एएनआय

नितीन गडकरी यांना दुपारी साडेचार वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावले - एएनआय 

सदानंद गौडा, गिरीराज सिंह यांना साडेचार वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले आहे - एएनआय

धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी यांनाही दुपारी साडेचार वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावण्यात आले आहे - एएनआय

मंत्रिपद मिळणाऱ्या खासदारांना दुपारी साडेचार वाजता नरेंद्र मोदी त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटणार - एएनआय

मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांना अमित शहांकडून फोन