पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या सुनावणीःयूपीत हालचालींना वेग, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

योगी आदित्यनाथ

अयोध्या प्रकरणी अखेरची सुनावणी आज सायंकाळी संपणार आहे. येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी अयोध्याप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याप्रकरणी आता कोणालाच जास्त वेळ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे संभाव्य निकालापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये हालचालींना वेग आला आहे. अयोध्यामध्ये १० डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारने सर्व पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ३० नोव्हेंबरपर्यंतच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सरकारने आपल्या आदेशामध्ये सर्व अधिकाऱ्यांना आपल्या मुख्यालयात तैनात राहण्याचे निर्देश दिली आहेत.

सुप्रीम कोर्टः मुस्लिम पक्षकारांच्या वकिलाने राम मंदिराचा नकाशा

राज्य सरकारच्या आदेशात सुट्ट्या रद्द करण्याचे कारण सण, उत्सव आदी कारणे सांगितले जात आहे. परंतु, पुढील महिन्यात अयोध्यप्रकरणी येणाऱ्या संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

तत्पूर्वी, अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज ४० व्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सायंकाळी याप्रकरणाची सुनावणी संपेल. आतापर्यंतच्या सुनावणीत हिंदू आणि मुसलमान पक्षकारांनी आपापली बाजू मांडली. दरम्यान, न्यायालयात आजच्या सुनावणीदरम्यान मोठे नाट्य घडले. मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी एका पुस्तकावरील राम मंदिराचा छापील नकाशा फाडून टाकला होता 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:before ayodhya verdict UP Government no leaves will be granted till 30th November to the officers in field