पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धीर धरा, शबरीमला प्रकरणात सुप्रीम कोर्टाची महिला आंदोलकांना सूचना

सर्वोच्च न्यायालय

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिलेल्या निकालाला गेल्या महिन्यात या प्रकरणी दिलेल्या निकालाने स्थगिती दिलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. पण तरीही मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यासाठी पोलिसांनी सुरक्षितता द्यावी, असे निर्देश न्यायालय तूर्त देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

फोर्ब्सच्या जगातील १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठामध्ये या प्रकरणी सुनावणी झाली. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. या संदर्भात न्यायालयाने आता कोणताही आदेश दिला तर परिस्थिती बिघडू शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

या संदर्भात केरळमधील दोन महिला आंदोलकांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्या. शरद बोबडे म्हणाले, शबरीमला मंदिरातील प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. परिस्थिती तूर्त बदलू नये म्हणून न्यायालय या संदर्भात आता काही आदेश देणार नाही. 

ब्रिटनमध्ये 'फिर एक बार बोरिस सरकार', ब्रेक्झिटचा मार्ग सुकर

बिंदू अमिनी आणि रेहना फाथिमा यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.